Thursday, May 14, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

अनुसूचित जाती व नवबौद्ध गटांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर योजनेत मोठा बदल, आता अर्थसहाय्य थेट बँक खात्यात

चंद्रपूर – अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधने पुरवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेत शासनाने महत्त्वपूर्ण बदल केला आहे. यापुढे या योजनेअंतर्गत लाभार्थी बचत गटांना वस्तू स्वरूपात सहाय्य न देता, थेट 3.15 लाख रुपयांचे मंजूर अर्थसहाय्य बचत गटाच्या आधार संलग्न बँक खात्यात VPDA प्रणालीद्वारे जमा करण्यात येणार आहे.

योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत:

बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. किमान ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत. अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती/नवबौद्ध घटकांतील असणे बंधनकारक. गटाचे बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेत असावे व आधार क्रमांकाशी संलग्न असावे. खरेदी करण्यात येणारे मिनी ट्रॅक्टर व उपसाधने भारत सरकारच्या अधिकृत यादीतील उत्पादकांकडूनच असावेत. अर्थसहाय्य जिल्हानिहाय ठरविलेल्या उद्दिष्टांनुसार मंजूर केले जाईल. ट्रॅक्टर चालविण्याचे अधिकृत प्रशिक्षण व प्रमाणपत्र आवश्यक. ट्रॅक्टर व उपसाधने विक्री किंवा गहाण ठेवता येणार नाहीत. त्यासाठी हमीपत्र व दरवर्षी १० वर्षे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य. यापूर्वी पॉवर ट्रिलर किंवा मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतलेल्यांना नव्याने लाभ मिळणार नाही.

या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक पात्र स्वयंसहाय्यता बचत गटांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथे संपर्क साधून अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News