Saturday, May 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

“डरो मत! तुमच्या घराला धक्का लागू देणार नाही” – काँग्रेसची जनजागृती पदयात्रा

घुग्घुस, चंद्रपुर : शहरातील अमराई, जुनी वस्ती, उडीया वस्ती, कृष्णमूर्ती किराणा ते भीमराव कोकरे यांचे घर पर्यंतच्या लोकवस्तीतील नागरिकांना अतिक्रमण हटाव कारवाईसंदर्भात नायब तहसीलदार कार्यालयातून नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या पार्श्वभूमीवर घुग्घुस शहर काँग्रेसच्यावतीने “डरो मत!” जनजागृती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.

काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या पदयात्रेमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वस्तीतील नागरिकांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. “काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तुमच्या घराच्या कौलालाही धक्का लागू देणार नाही,” असा विश्वास नागरिकांना देण्यात आला.

पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “गल्ली ते दिल्ली आणि जिल्हा न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत आम्ही लढा देऊ. नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा येऊ देणार नाही.”

या आंदोलनात काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, कुमार रुद्रारप, दिपक पेंदोर, सुनील पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, महिला शहर कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के, मंगला बुरांडे, शिल्पा गोहील, नीलिमा वाघमारे, हरीश कांबळे, अंकुश सपाटे, गुरुदेव गेडाम व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँग्रेसच्या या जनजागृती उपक्रमामुळे नागरिकांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला असून, अतिक्रमणाच्या नावाखाली होणाऱ्या अन्यायाविरोधात लढण्यास त्यांना पाठबळ मिळाले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News