Tuesday, April 28, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

बुलढाणा जिल्ह्यात भीषण अपघात : ६ जण ठार, २६ जखमी

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरालगतच्या शेगाव मार्गावर पहाटे एक भीषण अपघात झाला. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २६ जण जखमी झाले आहेत.

अपघाताचा मुख्य कारण ओव्हरटेक करणाऱ्या बोलेरो कारला समोरून येणाऱ्या एसटी बसची जोरदार धडक बसणे हे होते. यानंतर मागून येणाऱ्या खासगी बसनेही बोलेरोला धडक दिली. या दुर्घटनेत बोलेरोमधील ५ प्रवासी आणि एसटी बसमधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला.

जखमींना तातडीने खामगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, मात्र पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. अधिक तपास सुरू आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News