घुग्घुस (चंद्रपुर) : दि.2 एप्रिल 2025 रोजी घुग्घुस येथे 21 मार्च 2025 रोजी आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वाखाली जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या दरबारात नागरिकांनी विविध समस्या मांडत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. संकलित निवेदन आज (2 एप्रिल 2025) आमदार महोदयांच्या शिष्टमंडळाने घुग्घुस नगर परिषद मुख्याधिकारी यांना अधिकृतरित्या सुपूर्द केले.
या निवेदनात रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, पाणीपुरवठा, विजेच्या समस्या, सार्वजनिक सोयीसुविधा आणि शहराच्या विकासाशी संबंधित विविध मुद्दे समाविष्ट होते. नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.
शिष्टमंडळाने नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा करत नागरिकांच्या मागण्यांची तातडीने पूर्तता करण्याचे निर्देश दिले. नगर परिषदेने देखील या मागण्यांचा सकारात्मक विचार करून लवकरच आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी माजी पंचायत समिती उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी उपसरपंच संजय तिवारी, मयूर कलवल, स्वप्निल वाढई, साजन गोहणे, विनोद चौधरी, मुन्ना लोड़े, शाम अगदरी आदी मान्यवर उपस्थित होते.