Thursday, April 30, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

लालगुडा जि.प.शाळेने केला वाचनालयाचा शुभारंभ

कोरपना (चंद्रपुर) : वैयक्तिक व सामाजिक विकासासाठी तसेच वाचन संस्कृती संवर्धनासाठी कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद लालगुडा शाळेने ‘वाचन ध्यास ‘ या उपक्रमांतर्गत शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच गावातील वाचनप्रेमी तथा माजी विद्यार्थ्यांसाठी वाचनालय उपलब्ध करून देत नवा आदर्श निर्माण केला आहे.

गतवर्षी 77 हजार रुपयांचा निधी गोळा करून शाळेचे रुपडे बदलविणाऱ्या लालगुडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने आता डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या नावाने गावातील वाचन प्रेमी व विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी व स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी या उद्देशाने वाचनालय सुरू केले आहे.

वाचन हे मनाचे अन्न आहे. वाचनामुळे आपले ज्ञान वाढते. त्यामुळे प्रत्येकाने वाचनाचा छंद जोपासला पाहिजे, असे शाळेचे आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक गोविंद पेदेवाड यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थी तथा पालकांना समजाऊन सांगितले. तसेच वाचनालयाच्या पुस्तकांसाठी आर्थिक मदत करण्याचे सुध्दा यावेळी आव्हान करण्यात आले. या वाचनालयात सकाळी ७ ते ९ ही वेळ मुलांसाठी व सायंकाळी ३ ते ५ ही वेळ केवळ मुलींसाठी निश्चित करण्यात आली.

या वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी फकरू मरस्कोल्हे (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती), अमावस्या तोडासे (उपाध्यक्ष), लक्ष्मण कोडापे, चंदू पाटील मरस्कोल्हे, मोतीलाल तोडासे, भिकाजी सिडाम, संतोष तोडासे, देवराव सोयाम, मंगल तोडासे, वर्षा कोडापे, शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश बोबडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे माजी विद्यार्थी हुसेन मरस्कोल्हे, शितल शेडमाके, अनुराधा कोडापे, निलेश कोडापे, आकाश तोडासे यांनी सहकार्य केले.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News