जिल्हा परिषद प्रशासना कडून जाहीर आवाहन.
चंद्रपुर : सध्या पावसाळा जोरात सुरू आहे. पावसाच्या संततधारेमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून बरीच गावे पूरामुळे बाधित झाली आहे. त्यामूळे गावातील नागरिकांनी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.
घरात पिण्याचे पाणी घेतांना शक्यतो निर्जंतुकीकरण केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. पावसाळ्यातील दिवसात 20 मिनिटे उकळून थंड केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. पाणी घेतांना दुपदरी कापडाने गाळून पाणी घ्यावे. घरातील पिण्याचे पाणी उंच जागेवर ठेवावे. पाणी घेण्यासाठी ओरघड्याचा वापर करावा. पिण्याच्या पाण्यात मेडिक्लोरचा (क्लोरीन द्रावण) व जीवन ड्रॉप चा वापर करावा. पाणी गढूळ असल्यास तुरटीचा वापर करावा. शेतावर कामाला जातांना पिण्याचे पाणी घरून न्यावे. नदी, नाले किंवा शेतातील दूषित पाणी पिऊ नये. घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. घराजवळील डबके बुजवावे. घराशेजारी पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.आपल्या घराभोवती नाल्या, गटारात पाणी साचून राहणार नाही यादृष्टीने कार्यवाही करून पाणी वाहते करावे. साचलेल्या पाण्यात रॉकेल, डास,अळीनाशक औषधी फवारणी करावी. डासांपासून संरक्षण करण्याकरीता झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. या दिवशी घरातील सर्व पाणीसाठे रिकामे करून धुवून स्वच्छ कापडाने पुसून कोरडे करावे. रिकामे न करता येणाऱ्या पाणीसाठ्यात टेमी फासचा वापर करावा.