Monday, February 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

परभणी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन 2023-24 या आर्थिक वर्षात एनएसएफडीसी कर्ज योजनेच्या प्रस्तावासाठी जिल्ह्यातील मातंग समाजातील इच्छुक अर्जदारांनी https://beta.slasdc.org या वेबसाईट प्रणालीवर ऑनलाईन पद्धीतीने सादर करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर.एन.पवार यांनी केले आहे.

जिल्ह्याला सुविधा कर्ज योजनेमध्ये 50 चे भौतिक उद्दिष्ट असून प्रकल्प मर्यादा 5 लाख आहे. तसेच महिला समृध्दी योजनेचे भौतिक उद्दिष्ट 30 असून यामध्ये 1 लाख 40 हजार प्रकल्प मर्यादा ठेवण्यात आली आहे.

जिल्ह्यातील मांग/मातंग समाजातील अंतर्भाव असणा-या 12 पोट जातीतील इच्छूक अर्जदाराचे वय 18 वर्ष पुर्ण व 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. शहरी व ग्रामीण भागातील अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 3 लाख पेक्षा जास्त नसावे तसेच अर्जदाराने यापुर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन सदर योजनेत साधारणपणे समाविष्ट लघु व्यवसाय उदा. मोबाईल सर्व्हिसींग/रिपेअरींग, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक वस्तु रिपेअरींग, (फ्रिज, एस.सी., टि.व्ही, मायक्रोवेव्ह, लॅपटॉप, कॉम्प्युटर हार्डवेअर, व्युटी पार्लर, ड्रेस डिझायनिंग, टेलरिंग, फुड प्राडक्टस्/प्रोसेसिंग, किराणा दुकान, जनरल/स्टेशनरी स्टोअर्स, मेडीकल स्टोअर्स, फेब्रीकेशन/वेल्डींग, हार्डवेअर व सेनेटरी शॉप, प्रिंटींग, शिवनकला, झेरॉक्स/लॅमिनेशन, हॉटेल, केटरींग सर्व्हिसेस, मंडप डेकोरेशन, क्रिडा साहित्य/ स्पोर्ट शॉप, फास्टफुड सेंटर/ज्युस सेंटर, क्लॉथ/ रेडिमेड गारमेंट शॉप, मोटार मॅकेनिक/रिपेअर, शेतीशी निगडीत पुरक/जोडव्यवसाय तसेच वाहन इत्यादी व्यवसायासाठी कर्ज मागणी प्रस्ताव ऑनलाईल पध्दतीने सादर करावेत.

ऑनलाईन कर्ज सादर करताना जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अर्जदाराचे नुकतेच काढलेले पासपोर्ट साईज तीन फोटो, रेशन कार्ड (समोरचे पान व शेवटचे पान) आधार कार्ड (समोरील बाजु व पाठीमागील बाजु), मतदान कार्ड/ मोबाईन नं., पॅन कार्ड, व्यवसायाचे दरपत्रक (कोटेशन), व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या ठिकाणची भाडेपावती, भाडे करारनामा किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नं. 8), लाईट बील व टॅक्स पावतीसह प्रतिज्ञापत्र बॉन्डवर नोटरी सह), अर्जदाराने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशिल सादर करावा (पासबुक झेरॉक्स प्रत), ग्रामपंचायत/नगरपालिका/ महानगरपालिका यांचे ना हरकत प्रमाणपत्र किंवा शॉप ॲक्ट/उद्यम आधार परवाना, व्यवसायासबंधीत तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभावाचा दाखला, शैक्षणिक दाखला, अनुदान किंवा कर्जाचा लाभ न घेतल्याचे स्वयं घोषणापत्र, अर्जदाराचे सिबील क्रेडीट स्कोअर 500 असावा, वाहन खरेदीसाठी ड्रायव्हिंग लायसन्स व आर.टी.ओ. कडील प्रवासी वाहतुक परवाना, प्रकल्प अहवाल इत्यादी कागदपत्रे अपलोड करावयाची करावीत.

या योजनेचे कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या वेबसाईट पोर्टलवर दिलेल्या सुचनेनुसार दि. 12 फेब्रुवारी ते दि. 20 मार्च 2024 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने सादर करावा व सादर केलेल्या कर्ज मागणी अर्जाची व त्यासोबत अपलोड केलेल्या संपूर्ण कागदपत्रांची तीन प्रत (हार्ड कॉपी) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत कारेगांव रोड, परभणी येथे सादर करावी.

सुविधा कर्ज योजना या योजनेचे कर्ज मागणी अर्ज स्त्री व पुरुष हे अपलोड करतील. महिला समृध्दी योजनेचे कर्ज मागणी अर्ज फक्त महिला अर्जदार अपलोड करतील. सुविधा कर्ज योजना व महिला समृध्दी योजनेअंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थीचे कर्ज प्रकरण लाभार्थी निवड समितीच्या मान्यतेने प्रादेशिक कार्यालयास मंजुरीसाठी शिफारस करण्यात येईल. सुविधा कर्ज योजना व महिला समृध्दी योजना पैकी अर्जदार एकाच योजनेचा कर्ज प्रस्ताव अपलोड करु शकतील. सुविधा कर्ज योजना व महिला समृध्दी योजना या दोन योजनेअंतर्गत उद्दिष्टापेक्षा जास्तीचे प्रकरणे प्राप्त झाल्यास शासन निर्णय नुसार लाभार्थीचे निवड लॉटरी पध्दतीने केली जाईल असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News