Wednesday, May 27, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांसाठी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना

30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर : जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांना शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये इयत्ता बारावी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करून शैक्षणिक वर्षासाठी कोणत्याही व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतला असल्यास प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरावा. त्यासाठी सदर उमेदवार पात्र राहील.

ऑनलाईन अर्ज www.ksb.gov.in या वेबसाईटवर असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. उमेदवारांनी त्यांची मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्र स्कॅन करून प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेच्या अर्जासह अपलोड करावे. अपूर्ण किंवा चुकीचा अर्ज नाकारला जाईल, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News