घुग्घुस : घुग्घुस येथील झाडे बंधुतर्फे शुक्रवार, ८ सप्टेंबर रोजी जि.प.उच्च प्राथमिक शाळा घुग्घुस येथे गरजू मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
स्व.राजू लक्ष्मण झाडे यांचे २७ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या स्वप्नील राजू झाडे व नितीन राजू झाडे या दोन मुलांनी आपल्या वडिलांच्या तेरवीचा कार्यक्रम न करता सामाजिक बांधिलकी जोपासून वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ घुग्घुसच्या जि.प.उच्च प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, राजेश मोरपाका, सतीश बोन्डे, विक्की जंगम, स्यामसन रामटेके, केंद्र प्रमुख अनिल दागमवार, मुख्यध्यापक किशोर अल्याडवार, मुख्यध्यापिका ममता वासाडे, शिक्षक सतीश डांगरे, सुनंदा लिहीतकर व इतर शिक्षकवृंद उपस्थित होते.




