रत्नागिरी : गणेशोत्सव काळात रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने गणेश मूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुकीमध्ये वापरण्यात येणारी वाहने तसेच गणेशोत्सव कालावधीत गणेश मूर्तींची वाहतूक करणारी वाहने यांना पोलीसांकडून ना हरकत प्रमाणपत्र तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहन तपासणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे आणि अपघातमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याकरिता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांनी केले आहे.
वाहने आपल्या सोईनुसार मौजे हातखंबा येथील ब्रेक टेस्ट ट्रॅक, मौजे पिंपळी, ता. चिपळूण येथील ब्रेक टेस्ट ट्रॅक अथवा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी यापैकी कोणत्याही एका ठिकाणी तपासणी करिता सादर करुन प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे.




