चंद्रपूर : 1 जानेवारी 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत 18 ते 19 वयोगटातील जास्तीत जास्त नवीन मतदारांची नोंदणी करणे, मतदार यादीतील नावांची दुरुस्ती करणे, याकरीता दि. 12 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नव मतदारांनी सदर शिबिरात सहभागी होऊन मतदार नोंदणी करून घ्यावी. असे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी कळविले आहे.
12 सप्टेंबर रोजी मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन
Pranaykumar Bandi
WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com




