Wednesday, May 27, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

अति उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या माजी सैनिकांनी २१ पूर्वी संपर्क करा

रत्नागिरी : विविध क्षेत्रामध्ये राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवर अति उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या माजी सैनिकांनी संबंधीत कार्याबद्यलची प्रमाणपत्रे, गुणपत्रे, सैन्य सेवा पुस्तक, ओळखपत्र यासह २१ सप्टेंबर पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, येथे अर्ज सादर करावेत. अधिक माहितीकरिता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रत्नागिरी (दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२७१) येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

विविध क्षेत्रामध्ये राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवर अति उत्कृष्ट कामगिरी करणारे, जसे खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य संगित, गायन, नृत्य वादन इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार प्राप्त माजी सैनिक, नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे माजी सैनिक,शैक्षणिक क्षेत्रामध्ये इयत्ता १० वी व १२ वी च्या परीक्षेमध्ये ९० टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण माजी सैनिक/विधवांचे पाल्य, पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक/पत्नी/पाल्य् त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ तसेच राज्य स्तरावरील कार्याबद्यल एकरकमी रूपये १० हजार तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्याबद्यल रूपये २५ हजार पुरस्कार, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News