Tuesday, July 21, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुसमध्ये भव्य रक्तदान शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

घुग्घुस, चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभा यांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रभाग क्र. ९ मधील महाशक्ती माँ दुर्गा मंडळ, चांदशाह वली दर्गा परिसरात आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

रक्तदान हेच जीवनदान” या सामाजिक संदेशातून आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली. रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते, या भावनेने युवकांसह विविध वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

या प्रसंगी किशोर जोरगेवार, बलराम डोडाणी आणि तुषार सोम यांनी कार्यक्रमस्थळी भेट देत आयोजकांचे कौतुक केले तसेच रक्तदात्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव केला.

हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रभाग क्र. ९ च्या नगरसेविका व गटनेत्या मीना राजेश मोरपाका, राजेश मोरपाका, मयूर कलवल, राजेश डाकूर, वंशी महाकाली, स्वप्निल वडई, विशाल दामेर, चिरंजीवी तालापेली, सूरज मोरपाका, शुभम शेंडे, सतीश कांपेली आणि गणेश पिंपळकर यांनी अथक परिश्रम घेतले.

यावेळी आयोजकांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टी जनहिताच्या प्रत्येक उपक्रमात नेहमीच अग्रभागी राहील. समाजसेवा, आरोग्यविषयक जनजागृती आणि गरजूंना मदत करण्यासाठी भविष्यातही अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून नागरिकांनी त्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News