Friday, May 29, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

चंद्रपूर शहरात स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती अभियानाची सुरुवात

चंद्रपूर | चंद्रपूर शहरात स्वीप (Systematic Voters Education and Electoral Participation) अभियानाअंतर्गत मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात येत असून, या अभियानाची औपचारिक सुरुवात जनता महाविद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आली. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह तसेच महानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश यांच्या हस्ते स्वाक्षरी अभियानाची सुरुवात करण्यात आली.

आगामी चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी यावेळी केले. प्रत्येकाने मतदानाचे महत्त्व ओळखून जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह व महानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश यांनीही नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याचे आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आवाहन केले.

चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करणे, मतदानाचे महत्त्व पटवून देणे तसेच मतदानाचा टक्का वाढविणे या उद्देशाने संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात स्वीप अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत १ जानेवारी रोजी जनता महाविद्यालयात स्वाक्षरी अभियानासह पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच उपस्थित नागरिकांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, महानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश, अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकाडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, एस.टी. महामंडळाच्या विभागीय नियंत्रक स्मिता सुतवणे, जनता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष महातळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News