Wednesday, May 27, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

कोराडीतील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिरात यंदाचा नवरात्रोत्सव ऐतिहासिक ठरणार! विक्रमी ५५५१ घटांची स्थापना

नागपूर : कोराडी येथील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिरात यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव ऐतिहासिक स्वरूपात साजरा होणार आहे. मंदिर व्यवस्थापन समितीच्या माहितीनुसार, यंदा विक्रमी ५५५१ घटांची स्थापना करण्यात येणार असून, भाविकांना अखंड ज्योतीचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

२२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, मध्य भारतातील प्रमुख शक्तिपीठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या मंदिरात दरवर्षी लाखो भाविकांची उपस्थिती असते. मात्र यावर्षीच्या विक्रमी घटस्थापनेमुळे उत्सवाला विशेष आकर्षण प्राप्त झाले आहे.

भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी लक्षात घेता, मंदिर समिती, जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाच्या वतीने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मंदिर परिसरात सुरक्षा, वाहतूक व दर्शन व्यवस्थेसाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले असून, भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी स्वयंसेवकांचीही विशेष नियुक्ती केली जाणार आहे.

मंदिर परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि देवीच्या आरत्या यांचे आयोजनही करण्यात येणार असून, नवरात्रीच्या नऊ दिवसांत परिसरात भक्तिभावाचा महासागर अनुभवता येणार आहे.

श्री महालक्ष्मी जगदंबा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मंदिर समितीच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही समितीने केले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News