नागपूर : रोगनिदान विकृतीविज्ञान पीजी असोसिएशनतर्फे डायग्नोकॉन-२५ ही राष्ट्रीय परिषद १४ सप्टेंबर रोजी अमृत भवन, उत्तर अंबाझरी रोड, नागपूर येथे पार पडली. या परिषदेमध्ये एमआरआय निदान या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
ही परिषद आयुर्वेदिक पदव्युत्तर (पीजी) विद्यार्थ्यांना रोगनिदान विषयातील आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. देशभरातील विविध संस्थांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी व प्रतिनिधींनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.
या परिषदेमध्ये प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. आनंद हातगावकर (एमडी – रेडिओडायग्नोसिस) यांनी एमआरआय मेंदू आणि मणक्याच्या निदानात्मक दृष्टिकोनावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी आधुनिक एमआरआय तंत्रज्ञानाचा उपयोग करून मेंदू व मणक्याशी संबंधित विविध आजारांचे अचूक निदान कसे करता येते, याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी असोसिएशनचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि विविध विभागांचे मार्गदर्शक यांनी मोलाचे योगदान दिले. परिषदेमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक निदान पद्धतींचे व्यावहारिक ज्ञान मिळाले असून, ते त्यांच्या अभ्यासक्रमासाठी उपयुक्त ठरणार आहे.





