Tuesday, May 26, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

घुग्घुसमध्ये युवकाची आत्महत्या; पोलिस तपास सुरू

घुग्घुस, चंद्रपूर : शहरातील माऊली माता मंदिर परिसरात आज सकाळी एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. नागपुरे यांच्या घरी भाड्याने राहणारा राजकुमार उर्फ राजू सेबे (वय 35 वर्ष) या इसमाने सकाळी अंदाजे 7 वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेतला.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्या करणाऱ्या राजू सेबे यांच्या मागे पत्नी व एक मुलगा आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, घुग्घुस पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

स्थानिक नागरिकांत या घटनेमुळे खळबळ उडाली असून, राजूने टोकाचे पाऊल का उचलले, याची चौकशी पोलीस करत आहेत.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News