Wednesday, April 22, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

अमरावती विमानतळावर एटीआर-७२ चाचणी विमानाचे यशस्वी लँडिंग – हवाई सेवेसाठी मोठे पाऊल

अमरावती – विदर्भातील हवाई संपर्काला नवी गती देणाऱ्या अमरावती विमानतळावर आज प्रथमच एटीआर-७२ चाचणी विमानाचे यशस्वी लँडिंग झाले. प्रादेशिक संपर्क योजना (आरसीएस) – उडान अंतर्गत व्यावसायिक विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने ही चाचणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. हे विशेष चाचणी विमान इंदौरहून अमरावतीला आले होते.

महत्त्वाचा टप्पा गाठला
या विमानतळाच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) कार्यरत असून, उडान योजनेंतर्गत येथे आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. या यशस्वी चाचणीमुळे अमरावती विमानतळ व्यावसायिक हवाई सेवांसाठी सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विदर्भाच्या अर्थव्यवस्थेला चालना
अमरावती विमानतळ सुरू झाल्यास व्यापार, पर्यटन आणि उद्योग क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. विदर्भातील व्यावसायिक, उद्योगपती आणि प्रवाशांसाठी हे विमानतळ एक सुवर्णसंधी ठरणार असून, राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या शहरांशी अमरावतीचा हवाई संपर्क सुकर होणार आहे.

यापुढील टप्प्यात प्रवासी सेवांच्या अधिकृत घोषणेसाठी प्रक्रिया सुरू होईल. अमरावतीतील नागरीकांसाठी हे विमानतळ भविष्यातील प्रगतीचे प्रवेशद्वार ठरणार आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News