Wednesday, April 29, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

लातूर : दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बस पलटी, १५ ते २० प्रवासी गंभीर जखमी

लातूर – लातूरहून अहमदपूरला जाणारी एसटी बस दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात पलटी होऊन भीषण अपघात झाला. हा अपघात लातूर – नांदेड महामार्गावर चाकूर तालुक्यातील नांदगाव पाटीजवळ घडला.

https://www.facebook.com/share/v/16JsRjEast

अपघातात बसमधील १५ ते २० प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बसचालकाने समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोल जाऊन बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व बचावकार्य सुरू केले.

अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. अधिक तपास सुरू असून जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News