अमरावती : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2024-25 या वर्षासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे. यासाठी मोहिम स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहे.
मंजूर कार्यक्रमाच्या तुलनेत खर्च आणि प्राप्त अर्जाचे प्रमाण कमी असल्याने दि. 5 डिसेंबर 2024 पर्यंत क्षेत्रियस्तरावरून शेतकऱ्यांना महाडीबीटी प्रणालीवर उपलब्ध असणाऱ्या सुविधा, त्यावर अर्ज करण्याची कर्यपद्धतीबाबत विशेष मोहिम आयोजित करण्यात आली आहे. अनूसुचित जातीच्या शेतकऱ्यांनी क्षेत्रविस्तार घटाकांतर्गत फुलशेती, मिरची लागवड, नियंत्रित शेती घटकांतर्गत शेडनेट हाऊस, पॉली हाऊस, प्लॉस्टिक मलचिंग, काढणीत्तोर व्यवस्थापन घटकांतर्गत पॅक हाऊस, कांदाचाळ यांत्रिकीकरण घटाकांतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलरसाठी घटकनिहाय महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपूते यांनी केले आहे.




