अमरावती : देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. पात्र इच्छुकांकडून सन 2024-25 या वर्षासाठी अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
शैक्षणिक संस्थामधील सन 2024-25 मधील प्रवेश प्रक्रीया अद्याप पूर्ण झाली नाही. परिपूर्ण अर्ज आणि आवश्यक कागदपत्रासह दि. 31 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत पोस्ट किंवा समक्ष समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे-411001 येथे सादर करावे लागणार आहे. अर्जाचा नमुना आणि अधिक माहितीसाठी maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.




