सांगली, आरेवाडी – ३ एप्रिल रोजी सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथे आजपासून तीन दिवस चालणाऱ्या श्री बिरोबा यात्रेला धार्मिक उत्साहात प्रारंभ झाला. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोवा राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या या यात्रेला आज येळावीकरांच्या पारंपरिक गोड नैवेद्य दाखवून सुरुवात झाली.
या यात्रेचा दुसरा दिवस म्हणजे उद्या (४ एप्रिल) सार्वजनिक गोड नैवेद्याचा दिवस असून, यात्रेचा मुख्य दिवस शनिवार, ५ एप्रिल रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे. यात्रेसाठी आरेवाडी परिसरात भक्तांचा मोठा ओघ सुरू झाला असून, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे.
यात्रा काळात भाविकांसाठी प्रशासकीय यंत्रणेद्वारे सुरक्षा, आरोग्य, वाहतूक आणि स्वच्छतेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
श्री बिरोबा यात्रा ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून, चार राज्यांतील लोकांना एकत्र आणणारा सांस्कृतिक महोत्सव ठरत आहे.




