Friday, May 1, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

वरंध घाटात एसटी बस कोसळून अपघात; १५ ते १६ प्रवासी जखमी

 

 

रायगड: महाड – पुणे महामार्गावर वरंध घाटात एक एसटी बस खोल दरीत कोसळून अपघात झाला. या दुर्घटनेत बसमधील १५ ते १६ प्रवासी जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, रामदास पठार ते महाड अशी ही एसटी बस महाडच्या दिशेने येत असताना वरंध घाटातील एका तीव्र वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस रस्त्याच्या बाजूने सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी त्वरित मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले.

अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन पथक, पोलीस आणि एसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने बिरवाडी आणि महाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी घाटातील अवघड वळण आणि रस्त्याची परिस्थिती यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.

 

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News