Sunday, April 19, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

गडचिरोलीतील शासकीय आश्रमशाळांमध्ये धक्कादायक प्रकार – ३०९ विद्यार्थ्यांना पूर्व मुखकर्करोगाचे निदान

मुंबई | गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागातील शासकीय आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आरोग्य समस्यांचा उलगडा झाला आहे. सन २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीत गडचिरोली, भामरागड आणि अहेरी तालुक्यांतील आश्रमशाळांमध्ये एकूण ३०९ विद्यार्थ्यांना पूर्व मुखकर्करोगाचे (Pre-Cancerous lesions) निदान झाल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज विधानपरिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली.

या प्रकरणी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. उईके यांनी सांगितले की, गडचिरोली प्रकल्पांतर्गत तपासण्यात आलेल्या एकूण ७६९ विद्यार्थ्यांपैकी ३०४ जणांमध्ये मुखकर्करोगाच्या पूर्वचिन्हांची लक्षणं आढळून आली, आणि त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. त्यापैकी ७ विद्यार्थ्यांवर नागपूर येथे लेझर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

हा प्रश्न विधानपरिषद सदस्य डॉ. परिणय फुके आणि इतर सदस्यांनी उपस्थित केला होता. त्यांनी गडचिरोलीतील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनतेमुळे आरोग्य बिघडण्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

हे निदान आणि उपचार आदिवासी विकास विभागाच्या आरोग्य तपासणी मोहिमेत करण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर शासन अधिक दक्षतेने पुढील उपाययोजना राबवत असल्याचेही उत्तरात नमूद करण्यात आले.

संपर्कात असलेले मुद्दे

आदिवासी भागातील विद्यार्थी तंबाखू व इतर व्यसनांमुळे आरोग्याच्या धोक्यात

शासकीय आश्रमशाळांमध्ये आरोग्य शिक्षण आणि सवयींबाबत जनजागृतीची गरज

शासनाकडून उपचारांची तत्काळ व्यवस्था, परंतु प्रतिबंधक उपाय योजनांवर भर आवश्यक

ही बाब गांभीर्याने घेऊन स्थानिक प्रशासन, शिक्षण व आरोग्य विभाग यांनी संयुक्तपणे कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News